22 February 2020

News Flash

वयाची सत्तरी ओल्यांडल्यानंतरही कामाचा अट्टहास का?; बिग बी म्हणतात..

'केबीसी' या रिअॅलिटी शोच्या हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने बिग बींना हा प्रश्न विचारला.

अमिताभ बच्चन

वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही लाजवणारी आहे. ७६व्या वर्षीही बिग बी हे चित्रपट, रिअॅलिटी शो, जाहिराती अशा विविध माध्यमांमध्ये अजूनही स्वत:चा जम बसवून आहेत. अजूनही त्यांना बऱ्याच चित्रपटांमधील भूमिकांचे ऑफर्स येतात तर छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो त्यांच्याच सूत्रसंचालनामुळे अजूनही लोकप्रिय आहे. याच शोमध्ये एका स्पर्धकाने बिग बींना त्यांच्या कामाविषयी एक प्रश्न विचारला. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही बिग बी अजूनही इतकं काम का करतात, असा प्रश्न हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाने बिग बींना विचारला.

‘केबीसी’च्या खेळादरम्यान चित्रपटाविषयी एक प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर दिल्यानंतर त्या स्पर्धकाने बिग बींना या वयातही कामाचा अट्टहास का, असा प्रश्न विचारला. त्यावर बिग बींनी तितक्याच विनम्रतेने उत्तर दिलं. ”मी जे काम करतोय, ते मला खूप आवडतं. इथे येऊन तुमच्यासारख्या स्पर्धकांना भेटायला, तुमच्या आयुष्यातील गोष्टी ऐकायला मला आवडतं. आता या वयातही मला काम मिळतंय तर मी नकार का देऊ? समोर येईल ते काम मी स्वीकारू इच्छितो,” असं ते म्हणाले.

Video : बिग बींचा फोटो पाहताच रेखा यांची ‘ती’ प्रतिक्रिया आजही खळखळून हसण्यास पाडते भाग

अमिताभ बच्चन हे लवकरच ‘गुलाबो-सिताबो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुषमान खुराना स्क्रीन शेअर करणार आहे. त्यानंतर ते ‘AB आणि CD’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहेत. या चित्रपटात विक्रम गोखले व बिग बी हे दोन दिग्गज एकत्र काम करत आहेत.

First Published on October 10, 2019 1:32 pm

Web Title: amitabh bachchan gave answer to a contestant who asked him why he still works even after 70 yrs of age ssv 92
Next Stories
1 अन् बोल्ड सीन संपताच रेखांना कोसळलं रडू
2 Video : ‘टिक टॉक मधुबाला’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
3 Photo : इलियानाने बीचवर केलं बोल्ड फोटोशूट