संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा सुपूत्र अवीतेश श्रीवास्तव ऊर्फ अवी संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘मैं हुआ तेरा’ या आपल्या पहिल्या- वहिल्या गाण्याद्वारे गायक- संगीतकार- कलाकार म्हणून अवी जागतिक संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे.

दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते जॉर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गाणे आणि रेमो डीसुझा यांनी कोरिओग्राफ केलेल्या व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. मुंबईतल्या अंधेरी इथं हा सोहळा पार पडला.

याआधी अवीने शूजीत सरकार यांच्या ‘पीकू’ आणि विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात सहकार्य करून आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. त्यासोबत अमिताभ बच्चन यांच्या ‘जिंदगी’ चित्रपटाचे ‘आज की बात है’ हे शीर्षक गीत त्याने संगीतबद्ध केले आहे. तर ‘वन फॉर द वर्ल्ड’ मधे एकॉन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत परफॉर्म केलं आहे.

संगीतासोबतच अवीतेशला चित्रपटांचे काही ऑफर्स येत आहेत का असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘अद्याप अभिनेता म्हणून विचार केला नाही. पण योग्य संधी मिळाल्यास नक्कीच अभिनय करेन. सध्या मी संगीताला माझा अधिकाधिक वेळ देत आहे.’