19 January 2018

News Flash

बीग बी झाले ‘जीएसटी’चे नवे ब्रँड अॅम्बेसेडर

जीएसटीचं महत्त्व सांगताना भारताच्या तिरंग्याचा दाखला देताना दिसतात

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 9:34 PM

अमिताभ बच्चन

जीएसटी म्हणजेच वस्तू सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करणार आहे. यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्वीट केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

तब्बल १३ वर्षांनी लहान अभिनेत्याशी रोमान्स करतेय तब्बू

या व्हिडिओमध्ये अमिताभ हे जीएसटीचं महत्त्व सांगताना भारताच्या तिरंग्याचा दाखला देताना दिसतात. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचे ते या व्हिडिओमध्ये सांगतात. जीएसटीसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून या महानायकाची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती. येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करप्रणालींऐवजी जीएसटी हा एकच कर लागू होईल.

अमिताभ यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच बॉलिवूडचा हा शहेनशहा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात दिसणार आहे. या त्यांच्यासोबत आमिर खान आणि दंगल फेम फातिमा सना शेखही झळकणार आहेत. या सिनेमात कतरिना कैफची झळकही पाहता येणार आहे. ती एका नर्तिकेची भूमिका साकारणार आहे. पुढील वर्षी दिवाळीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आमिर आणि अमिताभ हे पहिल्यांदाच प्रेक्षकांना ६० एमएमच्या स्क्रिनवर एकत्र पाहायला मिळणार आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या सिनेमाच्या चित्रीकरणाला ५ जूनपासून सुरूवात झाली.

First Published on June 19, 2017 9:25 pm

Web Title: amitabh bachchan made gst brand ambassador by government
  1. No Comments.