दिवसेंदिवस बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोपती’ पर्व ११ हा शो रंजक होत आहे. मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पहिला जाणारा हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनुभव शेअर करतात. दरम्यान अनेक वेळा ते भावूक झाल्याचे पाहायला मिळते. तसेच अमिताभ बच्चन देखील शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से शेअर करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पंजाबमधील रुप नगर येथे राहणारे प्रतिक कलकल यांनी शोमध्ये हजेरी लावली. पण त्यांच्याशी गप्पा मारताना बिग बींनी नोकरीवरुन काढू नका अशी विनंती सोनी चॅनलला केली असल्याचे पाहायला मिळाले.

हॉट सीटवर बसलेल्या प्रतिक यांनी शोमध्ये आईला का आणले नाही असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला आहे. त्यावर प्रतिकने ‘माझ्या घरी गायीने एका वासला जन्म दिला आहे. ते वासरु आजरी आहे. त्याची काळजी घेण्यासाठी आई घरी थांबली असल्याचे’ सांगितले. ते ऐकून बिग बींना हसू येते. त्यानंतर प्रतिक यांनी त्यांच्या गायीचे नाव सलोनी असल्याचे सांगितले आणि बिग बींना तिच्या नुकताच जन्मलेल्या वासराचे नाव ठेवण्यास सांगितले. त्यावर ‘सलोनीचा “स” आणि शेवटचे अक्षर “न” आहे म्हणून वासराचे नाव “सोनी” ठेवा असे उत्तर दिले. बिग बींनी दिलेले उत्तर ऐकून सर्वांना हसू कोसळले आहे.

पण यानंतर बिग बींनी ‘मी चॅनलचे नाव सोनी आहे म्हणून वासराचे नाव “सोनी” ठवले असे नाही. हे नाव मी विचार करुन ठेवले आहे’ असा खुलासा केला. ते ऐकून प्रतिक म्हणाले ‘हो सर, कोणास ठावूक जर चॅनलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाली तर.’ ते ऐकून बिग बींना पुन्हा हसू येते. ‘सोनी चॅनल माझी काळजी घ्या. असे नको व्हायला की या नंतर मला नोकरी वरुन काढून टाकले’ असे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : नागराज यांचा ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात, अमिताभ यांनाही नोटीस

शोमध्ये प्रतिक यांनी ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम जिंकली आहे. त्यांना ६ लाख ४० हजार रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठावूक नसल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला.