News Flash

प्रोस्थेटिक मेकअपबाबत बिग बींनी व्यक्त केली चिंता

'जसे दिवस पुढे जात आहेत तसं हे सांभाळणं कठीण होत चाललंय,' असं अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय.

अमिताभ बच्चन

अभिनेते अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या उत्सुकतेचं कारण म्हणजे चित्रपटातील बिग बींचा लूक. हा लूक पाहून त्यांना ओळखणंदेखील कठीण होतं. प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने बिग बींचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. पण याच मेकअपमुळे ते सध्या चिंतेत आहेत.

प्रोस्थेटिक मेकअपमुळं होणारा त्रास बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमधून मांडला आहे. ‘प्रोस्थेटिक मेकअप करायला मी नेहमी तयार असतो. मात्र, त्याच्या अतिवापरामुळं शूटिंगअखेर प्रचंड थकवा येतो. पाश्चिमात्य सिनेसृष्टीतील काही नियम आहेत. त्या नियमांनुसार प्रोस्थेटिकचा वापर तीन दिवसांपेक्षा जास्त करु शकत नाहीत. जर तुम्हाला पुन्हा प्रोस्थेटिकची गरज लागलीच तर एक किंवा दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागतो. मात्र, आपल्याकडे अनेक महिने प्रोस्थेटिकचा वापर केला जातो. ‘पा’ चित्रपटातसुद्धा असंच झालं होतं. मी याबाबत काही तक्रार करत नाहीये. पण, जसे दिवस पुढे जात आहेत तसं हे सांभाळणं कठीण होत चाललंय.’ अशा शब्दांत बिग बींनी चिंता व्यक्त केली.

आणखी वाचा : धोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला – परेश रावल 

‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात बिग बींसोबत अभिनेता आयुषमान खुराना पहिल्यांदाच काम करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊ येथे सुरु असून २४ एप्रिल २०२० रोजी तो प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अमिताभ हे घरमालकाच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्यमान खुराणा त्यांचा भाडेकरू असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 5:28 pm

Web Title: amitabh bachchan says using prosthetics for a month is tough ssv 92
Next Stories
1 हेमा मालिनींचा झाडू मारण्याचा व्हिडीओ व्हायरल; धर्मेंद्र यांची भन्नाट प्रतिक्रिया
2 धोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला – परेश रावल
3 माधुरीची भेट हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण – क्रिती सनॉन
Just Now!
X