News Flash

अमिताभ बच्चन यांनी विकली ‘रॉल्स रॉयस’ गाडी, १२ वर्षापूर्वी मिळाली होती भेट

ही गाडी बिग बींची शाही ताफ्यातील एक होती

अफलातून अभिनयामुळे ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांना नवीन प्रकारच्या गाड्यांचा छंद आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचं दिसून येतं. या महागड्या गाड्यांच्या ताफ्यातली एक गाडी त्यांनी नुकतीच विकली आहे. अमिताभ यांनी विकलेली ही गाडी त्यांना १२ वर्षापूर्वी एका निर्मात्याने भेट म्हणून दिली होती.

अमिताभ यांनी त्यांची ‘रॉल्स रॉयस’ ही आलिशान गाडी विकली आहे. म्हैसूरस्थित एका व्यावसायिकाने ही गाडी विकत घेतली आहे. या व्यावसायिकाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. मात्र बिग बींची गाडी खरेदी केल्यामुळे या व्यावसायिकाला प्रचंड आनंद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, विधू विनोद चोपडा यांनी रॉल्स रॉयस ही गाडी २००७ मध्ये एकलव्य चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी दिली होती. या चित्रपटामुळे अमिताभ यांची कलाविश्वात नवी ओळख निर्माण झाली होती. चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे विधू चोपडा यांनी अमिताभ यांना भेट म्हणून ही गाडी दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी या गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये होती. त्यामुळे ही गाडी अमिताभ यांच्यासाठी खूप खास होती.  या गाडी व्यतिरिक्त बिग बींच्या आलिशान ताफ्यात ‘मर्सिडीज एस-क्लास’, ‘रेंज रोव्हर’, ‘बेंटली जीटी’ आणि ‘लेक्सस एसयुवी’ यासारख्या गाड्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 10:51 am

Web Title: amitabh bachchan sells his rolls royce
Next Stories
1 कंगनासारखं बोलणं मला जमत नाही, आलियाचा पलटवार
2 Photo : कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीचे फोटोशूट, दाखवला २० इंचाचा कट
3 राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकर का म्हणत आहेत ‘साथ दे तू मला’?
Just Now!
X