बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग, फोटो, व्हिडीओ, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी बिग बींनी स्वत:चा एक अॅनिमेटेड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे त्यांना आपले आयुष्य आईसक्रीमसारखे वाटत आहे.
काय म्हणाले बिग बी?
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर हा अॅनिमेटेड फोटो पोस्ट केला आहे. “आपलं आयुष्य आईसस्क्रीम किंवा एखाद्या गरम पेयासारखं आहे. आईसक्रीम वितळण्याआधी किंवा गरम पेय थंड होण्याआधी त्याचं सेवन करा.” अशा आशयाची कॉमेंट बिग बींनी या फोटोवर केली आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या अनोख्या पोस्टसाठी बिग बींचे कौतुक केले आहे. यापूर्वी अमिताभ सुशांत सिंह राजपुतसाठी लिहिलेल्या ब्लॉगमुळे चर्चेत होते. त्यांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक लांबलचक ब्लॉग लिहिला होता.