छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील संवाद हे कायमच चर्चेत असतात. नुकताच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी एका स्पर्धकाला चक्क एक चॅलेंज दिले आणि त्या स्पर्धकाने ते १६ सेकंदामध्ये पूर्ण करुन दाखवले आहे.
१९ जानेवारी रोजी पार पडलेल्या कौन बनेगा करोडपती शो मध्ये मंगलम कुमार हे हॉट सीटवर बसले होते. मगंलम कुमार हे नोएडा येथील असून केवळ २० वर्षांचे आहेत. शोदरम्यान अमिताभ यांच्याशी गप्पा मारत असताना मंगलमने त्यांना रुबिक क्यूब सॉल्व करण्याचा छंद असल्याचे सांगितले होते.
View this post on Instagram
अमिताभ यांनी मंगलमचे बोलणे ऐकल्यावर त्याला एक चॅलेंज दिले. बीग बींनी मंगलमला एक रुबिक क्यूब दिला आणि तो लाइव्ह सॉल्व करण्याचे चॅलेंज दिले. मंगलम यांनी ते स्वाकारले आणि १६ सेकंदामध्ये सॉल्व करुन दाखवले. ते पाहून अमिताभ यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी हे अदभूत आहे असे म्हटले.