24 September 2020

News Flash

उगवत्या महिला क्रीडापटूंना बिग बींची अशीही मदत!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेत असलेल्या दोन उगवत्या महिला क्रीडापटूंचा प्रशिक्षणाचा खर्च हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी उचलला आहे.

| June 16, 2014 05:45 am

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेत असलेल्या दोन उगवत्या महिला क्रीडापटूंचा प्रशिक्षणाचा खर्च हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी उचलला आहे. स्वतः बच्चन हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुलींविषयीच्या कार्यक्रमाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. त्यातच त्यांनी दोन उगवत्या महिला क्रीडापटूंचा खर्च उचलून नवा आदर्श घालून दिला आहे.
योनिका पॉल आणि पूजा घाटकर या दोघीही नेमबाज आहेत. त्यांच्याच प्रशिक्षणाचा खर्च अमिताभ बच्चन उचलणार आहेत. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या स्वयंसेवी संघटनेच्या मोहिमेअंतर्गत बच्चन या दोघींनाही मदत करणार आहेत. आगामी राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद आणि आशिया गेम्स या स्पर्धांमध्ये पॉल आणि घाटकर सहभाग घेणार आहेत. त्यासाठी त्यांची सध्या तयारी सुरू आहे. २०१६ मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा जिंकण्यासाठी या दोन्ही क्रीडापटूंना तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट या संपूर्ण मोहिमेमागे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 5:45 am

Web Title: amitabh bachchan sponsors training of two upcoming women athletes
Next Stories
1 आर. बल्कींच्या ‘शमिताभ’मधील गाण्यासाठी अमिताभ यांचा आवाज
2 पाहाः दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश आणि अनिकेतच्या ‘पोश्टर बॉइज’चा ट्रेलर
3 पाहा सलमान खानच्या ‘किक’चा ट्रेलर
Just Now!
X