News Flash

‘ती’ माझी मोठी चूक होती; मायकल जॅक्सन लूकमध्ये बिग बींनी शेअर केला फोटो

बिग बींनी शेअर केला मायकल जॅक्सन लूकमधील फोटो

बॉलिवूड अभिनेता कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. त्यामुळे अनेकदा ते कविता किंवा मतांसोबतच त्यांचे जुने फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे याचं कॅप्शन सध्या चर्चेत आलं आहे. ‘मायकल जॅक्सनची कॉपी करणं ही माझी मोठी चूक होती’, असं ते म्हणाले आहेत.

“जेव्हा मनमोहन देसाई यांना वाटलं, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटात मी मायकल जॅक्सनची कॉपी करु शकतो. माझी किती मोठी चूक होती ती”, असं कॅप्शन देत बिग बींनी हा जुना फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा- रणबीर-आलिया साखरपुडा करणार?; काका रणधीर कपूर यांनी केला खुलासा

दरम्यान, ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटात बिग बींसोबत मिनाक्षी शेषाद्री, जया प्रदा, अमरिश पुरी, मिथुन चक्रवर्ती निरुपा रॉय आणि अरुणा इरानी या दिग्गज कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:29 pm

Web Title: amitabh bachchan tried to replicate michael jackson in a film ganga jamuna saraswati ssj 93
Next Stories
1 रणथंबोरमध्ये आलिया-रणबीर करणार गुपचूप साखरपुडा?
2 राम चरणनंतर ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारलादेखील करोनाची लागण
3 कॉमेडियन राजू श्रीवास्तवला जीवे मारण्याची धमकी; अमित शाहंकडे मागितली मदत
Just Now!
X