31 October 2020

News Flash

मक्याचं कणीस ट्विट करत बिग बींनी सांगितलं यशाचं गमक; फोटो होतोय व्हायरल…

यशस्वी व्हायचंय तर पाहा अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला सल्ला

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या टीव्ही अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ची कोट्यवधींची ऑफर; कारण…

बिग बींनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोन मक्याचे कणीस दिसत आहेत. यामधील एक कणीस कच्चं आहे तर दुसरं भाजलेलं आहे. कच्च्या कणीसाची किंमत पाच रुपये आहे. तर भाजलेल्या कणीसाठी किंमत २० रुपये आहे. या फोटोचं उदाहरण देऊन बिग बींनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. “जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या मक्याच्या कणीसाप्रमाणे तुम्हाला मेहनतीच्या आगीत स्वत:ला झोकून द्यावं लागेल.” अशा आशयाचं ट्विट बिग बींनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार

यापूर्वी अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे चर्चेत होते. बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर परतले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या १२ व्या पर्वाचे काम रखडले होते. टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच के बीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले आहे. दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 4:54 pm

Web Title: amitabh bachchan tweet how to be successful in life mppg 94
Next Stories
1 तारक मेहता फेम दिशा वकानी ‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? निर्मात्यांनी दिलं आमंत्रण
2 अश्लील कॉमेंट करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; करणार कायदेशीर कारवाई
3 ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Just Now!
X