लॉकडाउनचा काळ हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठी कठीण काळ आहे. संयमाची परीक्षा घेणारा हा काळ आहे. आपल्या अनेक इच्छा-आकांक्षांना आवर घालून स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी घरीच थांबण्याचा हा काळ आहे. या काळाने सर्वांना काही ना काही तरी शिकवण दिली आहे. याचसंदर्भात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.

या ट्विटमध्ये बिग बींनी म्हटलंय, ‘या लॉकडाउनच्या काळात मी जितकं काही शिकलोय, समजलोय आणि जाणून घेतलंय ते मी माझ्या ७८ वर्षांच्या जीवनातसुद्धा शिकलं नव्हतं, समजलो नव्हतो आणि जाणून घेऊ शकलो नव्हतो. हे सत्य तुम्हाला सांगणं म्हणजे याच शिकवणीचा, समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा परिणाम आहे.’

आणखी वाचा : स्थलांतरितांना घरी पोहोचवण्याचं काम कधीपर्यंत सुरू ठेवणार? सोनू सूद म्हणतो..

आपल्याला आवश्यक तेवढ्याच आणि कमीत कमी वस्तूंमध्ये जीवन कसं जगायचं, हा मोलाचा संदेश या लॉकडाउनने अनेकांना दिला आहे. बिग बींनासुद्धा या लॉकडाउनने खूप काही शिकवलं आहे. जे गेल्या ७८ वर्षांच्या अनुभवात ते शिकू शकले नव्हते, ते त्यांना या लॉकडाउनच्या काळाने शिकवल्याचं त्यांनी म्हटलं.