14 December 2019

News Flash

..अन् बिग बींनी ‘केबीसी’त म्हटलं, ”शिष्टाचार नाही का तुम्हाला?”

तो प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन वरमले..

अमिताभ बच्चन

‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तंवर आणि समाजसेवक श्यामसुंदर पालीवाल हॉटसीटवर बसले होते. या खेळादरम्यान एक अशी घटना घडली की बिग बी अचानक म्हणाले, “शिष्टाचार नाही का तुम्हाला?” ‘करमवीर विशेष’ भागात खेळ सुरू असताना पाच हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न ऐकून बिग बी वरमले. हा प्रश्न ऐकताच त्यांची प्रतिक्रिया “हे भगवान” अशी होती.

पाच हजार रुपयांसाठी हा प्रश्न होता, “गाण्याच्या या भागात कोणत्या प्रकारच्या पत्नीचा उल्लेख केला आहे?” यानंतर त्यांनी कम्प्युटरला गाणं ऐकवण्याची सूचना दिली आणि त्यासोबतच म्हटलं की, मला आता फार भीती वाटतेय. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या बिग बींच्या ‘लावारिस’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘मेरे अंगने मै’ यावेळी ‘केबीसी’त वाजवण्यात आलं होतं. “जिसकी बीवी लंबी उसका भी बडा नाम है”, ही गाण्याची ओळ ऐकून बिग बी वरमले आणि कम्प्युटरला म्हणाले, “मला लाज वाटेल असं वाटू नका. तुम्हाला शिष्टाचार नाही का?”

आणखी वाचा : ‘बाला’ची तिकीटबारीवर चांगली घोडदौड

हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. या गाण्याशी संबंधित असलेला प्रसंगसुद्धा त्यांना यावेळी सांगितला. हे गाणं त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन होळीला गायचे. एकदा बिग बींनी प्रकाश मेहरा यांना होळीच्या दिवशी आपल्या घरी बोलावलं. त्यावेळी हरिवंशराय बच्चन यांनी गायलेलं हे गाणं ऐकून प्रकाश मेहरा फार खूश झाले. हे गाणं चित्रपटात वापरण्याविषयी त्यांनी बिग बींना विचारलं. होकार देताच मेहरा यांनी ते गाणं बिग बींना त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याची मागणी केली. अशा प्रकारे हे गाणं, ‘लावारिस’ या चित्रपटाचा भाग बनला.

First Published on November 10, 2019 1:40 pm

Web Title: amitabh bachchan was embarrassed on a question in kbc said tameez nahi aapko ssv 92
Just Now!
X