News Flash

तेव्हा मी अंध होईन की काय असं वाटलं होतं; अमिताभ यांनी सांगितला किस्सा

अमिताभ यांनी ब्लॉगमधून व्यक्त केली भिती

महानायक अमिताभ बच्‍चन यांनी चित्रपटात येण्यापूर्वी इतर कामं केली आहे. फिल्‍मफेअरच्या रिपोर्टनुसार अमिताभ यांनी कोलकाता येथील शिपिंग फर्मवर महिना ५०० रूपयांवर नोकरी केली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओज आणि ब्लॉग्सच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावेळी बिग बिंनी आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. त्यांना चक्क अंध होण्याची भिती सतावत आहे.

नेमकं काय म्हणाले अमिताभ?

“गेल्या काही दिवसांपासून मला अंधुक दृश्य दिसत आहेत. काही वेळा तर डोळ्यांसमोर एकाच गोष्टीची दोन प्रतिबिंबे उभी राहतात. आधीच शरीरात इतक्या व्याधी होत्या. त्यात आता आणखी एका व्याधीचा उगम होत आहे. मला आता अंध होण्याची भिती सतावत आहे.” अशा आशयाचा ब्लॉग अमिताभ यांनी लिहिला आहे.

परंतु बिग बिंनी या ब्लॉगमध्ये त्यावर उपाय देखील सांगितला आहे. ते म्हणतात, “घबरण्याचं कारण नाही. स्क्रीनसमोर तासनतास पाहिल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. डॉक्टरांनी मला औषध दिलं आहे. कदाचित जास्त काम करुन डोळे थकल्यामुळे असं अंधुक दिसत असावं.” अमिताभ यांचा हा ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

https://srbachchan.tumblr.com/ – या लिंकवरुन तुम्ही अमिताभ यांचा पुर्ण ब्लॉग वाचू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 1:31 pm

Web Title: amitabh bachchan worried about vision loss mppg 94
Next Stories
1 Video : लॉकडाउनध्ये राखी उपाशी; मासे पाहून तोंडाला सुटलं पाणी
2 आर्थिक मदतीचा गाजावाजा करायचा नव्हता; तापसीचं ट्रोलर्सना उत्तर
3 Lockdown : घरात राहून उर्वशीची झाली मंजुलिका; व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबराल!
Just Now!
X