News Flash

‘पीकू’साठी अमिताभने वजन वाढवले

कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी एखाद्या चित्रपटात वेगळी भूमिका साकारणे एक आव्हान असते. रंगभूषा आणि वेषभुषेमुळे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल घडून येतोच पण तो कलाकारही

| November 2, 2014 06:56 am

कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी एखाद्या चित्रपटात वेगळी भूमिका साकारणे एक आव्हान असते. रंगभूषा आणि वेषभुषेमुळे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल घडून येतोच पण तो कलाकारही आपली भूमिका वेगळी व्हावी म्हणून स्वत:हूनही प्रयत्न करत असतो. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आगामी ‘पीकू’ या चित्रपटातही अशाच वेगळ्या गेटअपमध्ये पाहायला मिळणार आहे.
एके काळी ‘अ‍ॅंग्री यंग मॅन’च्या भूमिकेत असलेल्या अमिताभने कालांतराने आपल्या वयाला साजेसे चित्रपट आणि भूमिका स्वीकारणे सुरु केले. अमिताभच्या चाहत्यानाही त्याला त्या वेगळ्या रुपात स्वीकारले. याचे ठळक उदाहरण म्हणजे अमिताभचा ‘पा’ हा चित्रपट. या चित्रपटात अमिताभ वेगळ्याच रुपात पाहायला rv04मिळाला होता. रंगभूषा आणि वेशभुषेमुळे अमिताभचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलण्यात आले होते. असे म्हणतात की या गेटअपमध्ये तो पहिल्यांदा चित्रीकरणासाठी सर्वासमोर आला तेव्हा सेटवरही त्याला कोणी ओळखले नव्हते.
आता ‘पीकू’च्या निमित्ताने पुन्हा एकदा अमिताभचा वेगळा ‘लूक’ पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडचे अभिनेते स्वत:चे पाच/सहा अंकांपासून पासून पुढे ‘पॅक्स’ बनवत असताना अमिताभने ‘पीकू’साठी आपले वजन काही प्रमाणात वाढविले आहे. चित्रपटातील भूमिकेची गरज म्हणून अमिताभने आपल्यात हा बदल केला असल्याचे सांगण्यात येते. आपल्यातील या बदलाचे छायाचित्र अमिताभने स्वत:च ‘ट्विटर’ या सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअरही केले आहे. ‘पीकू’तील भूमिकेसाठी अमिताभ सध्या ‘सी फूड’ घेत आहेत. शूजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
‘ट्विटर’वरून अमिताभने ‘पीकू’तील आपल्या भूमिकेचे हे छायाचित्र सगळ्यांसमोर सादर केल्याने सध्या बॉलिवूडमध्ये अमिताभच्या या भूमिकेची आणि आगळ्या ‘लूक’ची चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 6:56 am

Web Title: amitabh bachchans pot bellied look in piku
Next Stories
1 ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’जस्ट टाइमपास!
2 ‘चंद्रकांत चिपलुनकर’च्या घरी प्रेम चोप्रांची हजेरी
3 ‘बाजीराव मस्तानी’साठी प्रियांकाला मराठीचे धडे
Just Now!
X