06 December 2019

News Flash

घाडगे & सून फेम प्रतीक्षा लवकरच रुपेरी पडद्यावर

प्रतीक्षाने घाडगे & सूनमध्ये कियारा ही व्यक्तीरेखा साकारली आहे

प्रतीक्षा मुणगेकर

सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा मुणगेकर. घाडगे & सून या मालिकेमध्ये कियारा ही व्यक्तीरेखा साकारणारी प्रतीक्षा घराघरात पोहोचली आहे. उत्कृष्ट अभिनयामुळे नावारुपाला येत असलेल्या प्रतीक्षाच्या करिअरचा आलेख चांगलाच उंचावताना दिसत आहे. आतापर्यंत मालिकांमध्ये काम करणारी प्रतीक्षा लवकरच एका नवा चित्रपटामध्ये झळकणार आहे.

‘बाबो’ या आगामी चित्रपटातून प्रतीक्षा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती एका हटके भूमिकेत दिसून येणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत अमोल कागणेदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात ती अमोल कागणेच्या प्रेयसीची भूमिका वठविणार आहे.

नटखट, प्रेमळ-लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे उलट अमोल हा मध्यम वर्गीय. अमोल आणि प्रतीक्षाच्या प्रेमाला समाज मान्यता लाभणार का ? त्यांचं प्रेम यशस्वी होतं का ? घरच्यांचा विरोध श्रेष्ठ की प्रेम ? काठ-शाहचा हा खेळ गमतीशीर पद्धतीने ‘बाबो’ मध्ये मांडला आहे.

अमोल कागणे या तरुणाने पदार्पणातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यशस्वी निर्मात्याचे बिरुद पटकावलं. अमोल लक्ष्मण कागणेने खऱ्या अर्थाने मराठी मनोरंजनक्षेत्राला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर आत्ता अमोल कागणे अभिनयक्षेत्रासाठी सज्ज झाले आहेत. पुण्यामधील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या अमोल कागणेने तब्ब्ल २६ हुन आधी नाटकांत अभिनय केला आहे. तर प्रतीक्षा मुणगेकर या नवोदित अभिनेत्रीने या आधी ‘विडा एक संघर्ष’ आणि ‘मातंगी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे. शिवाय ‘कियारा’ हे तिचे सध्या गाजत असलेले पात्र सध्या अतिशय लोकप्रिय आहे.

मल्हार फिल्म्स क्रिएशन्सचा ‘बाबो’ या चित्रपटातून अमोल आणि प्रतीक्षा ह्यांची युथफूल जोडी आपल्यालाही प्रेमात पडेल अशीच आहे. रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ या चित्रपटात अमोल आणि प्रतीशची लव्हेबल केमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी रोमँटिक ट्रीट असणार आहे.

First Published on April 17, 2019 1:24 pm

Web Title: amol kagane and pratiksha mungekar new marathi film baboo
Just Now!
X