बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता राव हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी अमृता-अनमोलच्या टीमने शेअर केली आहे. रविवारी सकाळी अमृताने बाळाला जन्म दिला असून बाळ आणि अमृता दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचं म्हटलं जात आहे.

अमृताचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री ‘विवाह’ चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनमोल आणि अमृता पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

दरम्यान, अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास ७ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. अमृताने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘इश्क-विश्क’, ‘विवाह’ या चित्रपटांमुळे ती प्रकाशझोतात आली. या दोन्ही चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच तिने ‘मैं हूँ ना’, ‘सत्याग्रह’, ‘मस्ती’, ‘वाह लाइफ हो तो एैसी’, ‘प्यारे मोहन’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘विक्ट्री’, ‘लाइफ पार्टनर’, ‘जॉली एलएलबी’, ‘सिंह साहेब द ग्रेट’, ‘शौर्य’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.