News Flash

.. म्हणून सैफ-अमृता सिंगच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल

त्यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सैफ अली खान, अमृता सिंग

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट होऊन अनेक वर्षे लोटली. पण, तरीही या जोडीबद्दल बरीच चर्चा केली जाते. आता हेच बघा ना त्यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण काही वेगळेच आहे.

वाचा : ‘चलती है क्या ९ से १२’ गाण्याला वरुण, जॅकलिन, तापसीचा हटके ट्विस्ट

आता हा फोटो पाहिल्यावर तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. अनेकदा हा फोटो आम्ही पाहिलाय…. ठीक तर आहे. पण, जर तुम्ही फोटोकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला तो का व्हायरल होतोय याचे कारण नक्कीच कळेल. तुम्हाला अजूनही कळले नाही का? अमृता सिंगने नाकात घातलेली भलीमोठी नोज रिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, त्यावरच आता ट्रोल केले जातेय. एका ट्विटर युजरने लिहिलेय की, ‘अमृता सिंगची नोज रिंग माझ्या फ्रेण्ड सर्कलपेक्षाही मोठी आहे.’ तर दुसऱ्याने लिहिलेय की, ‘माझ्या करिअर गोलपेक्षाही अमृताची नोज रिंग मोठी आहे.’

वाचा : तिहेरी तलाक, राइट टू प्रायव्हसीवर ट्विंकलचा विनोद वाचलात का?

Next Stories
1 Ganesh Chaturthi 2017: बॉलिवूडकरांनी असे केले बाप्पाचे स्वागत
2 Judwaa 2 song Chalti Hai Kya 9 Se 12: ‘चलती है क्या ९ से १२’ गाण्याला वरुण, जॅकलिन, तापसीचा हटके ट्विस्ट
3 एक वर्षाची झाली मिशा; शाहिदने शेअर केला क्यूट सेल्फी
Just Now!
X