सिने जगतातील लोकप्रिय मासिकांमध्ये सॅव्ही या मासिकाचा समावेश होतो. आजपर्यंत या मासिकाच्या कव्हरपेजवर प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, माधुरी दिक्षित, आलिया भट, लिसा रे करिना कपूर, विद्या बालन आणि असंख्य अभिनेत्री झळकल्या आहेत. पण यंदाच्या या मासिकाच्या कव्हरपेजवर तुम्हाला कुणी अभिनेत्री दिसणार नसून त्यावर चक्क आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दिसणार आहेत. १६ जूनला प्रसिद्ध होणा-या सॅव्ही मासिकाच्या कव्हरपेजवर अमृता फडणवीस आपल्याला पाहायला मिळतील.
यंदा सॅव्हीचे हे बत्तीसावे वर्ष आहे. घर आणि काम या दोन्ही आघाडी सांभाळण्यात यशस्वी ठरल्याबद्दल त्यांना हा मान मिळाल्याचे कळते.  सॅव्हीच्या कव्हरपेजबाबत अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सॅव्हीच्या संपादिका अॅन्ड्रीया कॉस्टाबीर यांच्याशी माझी प्रथम भेट झाली. त्या म्हणाल्या की त्यांना एक सामान्य स्त्री हायलाईट करायची आहे.  त्यांच्या कव्हरपेजवर येऊन एखाद्या स्त्रिला जरी मी प्रेरणा देऊ शकले तर त्यापेक्षा अधिक चांगलं काय असेल. सॅव्हीची हीच संकल्पना मला आवडली. मी एक मुक्त व्यक्ती आहे. माझ्याकडची प्रतिभा आणि कौशल्य मी अगदी योग्य पद्धतीने इतरांच्या भल्यासाठी वापरू शकते, असेही त्या म्हणाल्या.
नुकतेच त्यांनी फॅशन इन्स्टिट्यूटच्या फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
amruta-fadnavis-2