मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये मैत्रीचं घट्ट नातं आहे. मराठी मनोरंजन विश्वात अमृता आपली आवडती अभिनेत्री आहे असं कौतुक रणवीरनं केलं होतं. रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट आज १४ फेब्रवारीला प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी मी मुंबईत नाही अशी खंत अमृतानं व्यक्त केली आहे.

‘गली बॉय’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी मी मुंबईत नाही याचा मला पश्चाताप होत आहे. हा रणवीरचा सर्वोत्तम चित्रपट आहे असं मला मित्रपरिवाराकडून ऐकायला मिळत आहे. त्यांनी चित्रपट पाहिला पण माझी संधी मुकली याचं दु:ख होतंय अशी खंत ट्विटरवर अमृतानं बोलून दाखवली आहे.


झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील रणवीर -आलियाचा अभिनय पाहून आंतराराष्ट्रीय माध्यम आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं होतं. तर भारतीय चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं खूप कौतुक केलं.