मार्च महिन्यात देशात करोनाची चाहूल लागताच सर्वप्रथम चित्रपटगृहे आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १४ मार्चच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले आणि त्याआधीच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले आणि चांगली कमाई करत असलेले हिंदी-मराठी चित्रपट अशा सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन थांबले आहे. या रखडलेल्या चित्रपटांना लॉकडाउन उठायच्या आधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अंशी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार मिळतो आहे. बरेच बॉलिवूड चित्रपट ओटीटीकडे वळले आहेत. आता मराठी चित्रपटसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. ‘परिणती’ हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याविषयी निर्णय घेतले जात आहेत.

‘परिणती’चे निर्माते आणि पराग मेहता याविषयी म्हणाले, “बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली पावले टाकली आहेत. आमच्यासमोरही हा एक पर्याय होता आणि डिजिटल उत्क्रांतीचा उदय म्हणून पुढाकार घ्यावा लागणारच होता. आमचा हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.”

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : प्रशांत दामलेंसोबत रंगणार गप्पांची संध्याकाळ, तुम्हीही व्हा सहभागी

या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांची मुख्य आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय बाळसराफचे आहे.