15 November 2019

News Flash

दीपिका आणि ऐश्वर्या एकत्र! अमूलची ही भन्नाट जाहिरात पाहिली का?

या पोस्टवर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हटके अंदाजात दिसत आहे

सामाजिक विषय आणि ताज्या घडामोडींवर भाष्य करणाऱ्या हटके पण कार्टून स्वरुपातील जाहिराती हे ‘अमूल’ कंपनीचे वैशिष्ट्य आहे. या कंपनीच्या नव्या कार्टून पोस्टरसाठी वाचकांनाही प्रतीक्षा असते. आता अमूलने त्यांचे एक नवे कार्टून पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टवर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हटके अंदाजात दिसत आहे.

दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अमूलचे कार्टून पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाने कान्स महोत्सवादरम्यान परिधाना केलेला हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे ऐश्वर्याने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तसेच दोघींच्याही हातात ब्रेडची स्लाईस असल्याचे दिसत आहे. या पोस्टरवर ‘गोरी तेरा गाऊन बडा न्यारा’ अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांना प्रचंड आवडले आहे.

View this post on Instagram

Cannes-17th May,2019. #Cannes2019

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

View this post on Instagram

💖My Sunshine Forever☀️🌈✨ 💖LOVE YOU ❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

याआधी देखील अमूलने असेच एक हटके कार्टून पोस्टर प्रदर्शित केले होते. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली होती. राहुल गांधींची ही गळाभेट चांगलीच गाजली होती. गळाभेटीनंतर लगेच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गळाभेटीचे विश्लेषण करु लागले होते. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे अमूलच्या कार्टूनने. या कार्टून पोस्टरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असल्याचे दिसत होते. हे पोस्टर लोकांना ते प्रचंड आवडले होते.

First Published on May 26, 2019 5:56 pm

Web Title: amul cartoon indian actress deepika padukone and aishwarya rai bachchan