19 September 2020

News Flash

Photo : गर्भवती अ‍ॅमी जॅक्सनचं टॉपलेस फोटोशूट

अ‍ॅमी आठ महिन्यांची गर्भवती आहे

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या प्रेग्नंसीचे फोटोशूट करण्याचं नवं क्रेझ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नंसी काळातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर काही अभिनेत्रींनी प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही केलं आहे. काही दिवसापूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डीने अंडर वॉटर फोटोशूट केलं होतं. त्यानंतर आता ‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे अ‍ॅमीने टॉपलेस फोटोशूट केल्यामुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन गर्भवती असून ती तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. अ‍ॅमीने आतापर्यंत बेबी बंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले असून यावेळी तिने टॉपलेस फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अ‍ॅमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने एक मोठी कॅप घातली असून “ग्रीस!?! नाही मंचकिन आणि मी, उन्हाळ्यामधील काही अखेरचे दिवस मागच्या बागेत व्यतीत करत आहे. मी ऑफिशिअली प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यात आहे. माझं शरीर,बेबी बंप,स्ट्रेच मार्क्स वाढलेलं वजन आणि मातृत्वाशी संबंधीत प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत आहे”, असं या फोटोला दिलं आहे.


दरम्यान, अ‍ॅमीने जानेवारी महिन्यात अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला होता. जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 10:40 am

Web Title: amy jackson pregnant topless photo shoot ssj 93
Next Stories
1 कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी अ.भा.मराठी नाट्य परिषदेचा मदतीचा हात
2 गुजरातीतील ‘हेल्लारो’ चित्रपटाला सुवर्ण कमळ
3 प्रा. डॉ. हेमा साने यांच्यावरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार
Just Now!
X