News Flash

यशोमान आपटेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

'आनंदी हे जग सारे' ३ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर

‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेने काही वर्षांचा अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढंच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट बघतेय. तिच्या स्वप्नातला हा राजकुमार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून छोट्या पडद्यवरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे आहे. आधी काही मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या यशोमानची ही दुसरी मालिका आहे. आनंदीची व्यक्तिरेखा रूपल नंद ही अभिनेत्री साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने यशोमान आणि रुपल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेच्या नवीन प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आनंदीचे बाबा म्हणेजच आस्ताद करत असेलली आनंदीची काळजी आणि स्वप्नाळू आणि स्वछंदी आनंदी या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आणि आनंदीच्या स्वप्नांचा राजकुमाराची म्हणेजच यशोमानची एंट्री सुद्धा मालिकेत होणार आहे. प्रोमो पाहून मालिका बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

आणखी वाचा : रक्षाबंधन निमित्त झी टॉकीजवर ‘तुला जपणार आहे’ चित्रपट महोत्सव

‘आनंदी हे जग सारे’ ही मालिका ३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 1:04 pm

Web Title: anandi he jag sare coming soon with new story and actors ssv 92
Next Stories
1 रक्षाबंधन निमित्त झी टॉकीजवर ‘तुला जपणार आहे’ चित्रपट महोत्सव
2 ११ भागांची भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’
3 “म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते”; अंकिता लोखंडेने सांगितलं कारण
Just Now!
X