News Flash

नेहमी मला ट्रोल केले जाते; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

तिने एका शोमध्ये हे वक्तव्य केले आहे.

‘स्टूडंट ऑफ द इयर २’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. या चित्रपटानंतर अनन्याने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पिली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण एका शोमध्ये तिने ट्रोलिंगवर वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच अनन्याने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘वॉट विमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने ट्रोलिंगवर वक्तव्य केले. ‘जर ट्रोलिंग विषयी बोलायचे झाले तर मी काही बोलले किंवा कितीही चांगले कपडे परिधान केले तरी मला नेहमीच ट्रोल केले जाते. पण त्याचा परिणाम माझ्यावर होत नाही’ असे अनन्या म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Diet Sabya (@dietsabya)

दरम्यान अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरचा अनुभव सांगितला. ती करिअरच्या सुरुवातीला इतरांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा विचार करायची पण आता ती तिला ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करते असे अनन्या म्हणाली.

अनन्या लवकरच तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करणार आहे. तिला आणि विजय देवरकोंडाला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. या व्यतिरिक्त ती दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 4:16 pm

Web Title: ananya panday reaction on trolling avb 95
Next Stories
1 नजर वेधून घेणारी नोज रिंग, कपाळी कुंकू… मिलिंद सोमणचा हटके लूक
2 नेहा कक्करने शेअर केला ‘First Kiss’चा व्हिडीओ, पाहून पती म्हणाला…
3 गोविंदावरुन टोमणा मारताच कृष्णा अभिषेक म्हणाला…
Just Now!
X