कोणालाही कुणकुण लागू न देता अंगद आणि नेहा धुपियानं काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. सोनम आणि आनंद आहुजाच्या लग्नांच्या चर्चेतून चाहते बाहेर येत नाही तोच नेहा आणि अंगदन १० मे रोजी गुपचूप लग्न केलं. नेहाची इन्स्टाग्राम पोस्ट पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेहा अंगदनं या लग्नसोहळ्यासाठी भलेही बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातल्या बड्या मंडळींना आमंत्रण देणं टाळलं असलं तरी लवकरच हे दोघंही त्यांच्यासाठी ग्रँड रिस्पेशनही ठेवणार आहे.

नेहा आणि अंगद हे दोघंही सध्या त्यांच्या कामात व्यग्र आहे. या व्यग्र वेळापत्रकातून दोघांनाही रिसेप्शनची तयारी करण्यास अपुरा वेळ मिळत असल्याचं दोघांनीही मान्य केलं आहे. कामाच्या गडबडीतून आम्ही कसा बसा वेळ काढला पण, आम्हाला हवा तसा व्हेन्यू मिळत नसल्याचं दोघांनीही कबुल केलं आहे. जुलै महिन्यात नेहा- अंगद ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. या रिस्पेशनसाठी जवळपास २ हजारांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा विचार हे दोघंही करत आहेत.

नेहाला या रिसेप्शनसाठी अमिताभ बच्चनसह अनेकांनी उपस्थिती लावावी अशी इच्छा आहे पण सध्या बिग बींसह बॉलिवूडमधले अनेक कलाकार व्यग्र आहेत त्यामुळे कलाकार आणि क्रिकेटर्सच्या वेळा लक्षात घेऊन रिसेप्शनची तारिख ठरवणं दोघांनाही अवघड जात असल्याचंही त्यांनी कबुल केलं. पण साधरण जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नेहा- अंगदचा जंगी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.