News Flash

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारी रोजी अनिताने एका मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रोहित रेड्डीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये अनिता दिसत आहे तर दुसऱ्या एका फोटोमध्ये फोनच्या स्क्रीनवर बाळाचा चेहरा दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनितासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ९ फेब्रुवारी २०२१ ही तारीख टाकण्यात आली आहे तसेच मुलगा झाला असे देखील लिहिले आहे. अनिताच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

अनिताने सप्टेंबरमध्ये सोशल मीडियापोस्टद्वारे आई होणार असल्याची माहिती दिली होती. अनिताने फोटो शेअर करत ‘मी २०२१ची वाट पाहात आहे आणि त्यासाठी खूप उत्सुक आहे’ असे कॅप्शनमध्ये म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनंतर अनिता आणि रोहितने फोटोशूट केले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

आणखी वाचा- लग्नाच्या ८ वर्षांनंतर अभिनेता झाला बाबा, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये त्या दोघांनी भूमिका साकारली होती. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 10:38 am

Web Title: anita hassanandani and rohit reddy bless with baby boy avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये पॉर्न फिल्मसची मागणी वाढली म्हणून…पॉर्न रॅकेट प्रकरणात धक्कादायक खुलासा
2 नसीरुद्दीन शाह यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल ट्विटचं सत्य
3 माझ्या इतकी प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण पृथ्वीवर शोधून दाखवा, सापडली तर…; कंगनाचं ट्विट
Just Now!
X