26 September 2020

News Flash

PHOTOS: कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न

'आशिकी २'मधील गाण्यामुळे अंकित प्रकाशझोतात आला.

अंकित तिवारी आणि त्याची पत्नी पल्लवी शुक्ला

मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून नुकतीच टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता ‘सुन रहा है ना तू’, ‘गलियाँ’ यांसारख्या गाण्यांमध्ये प्रकाशझोतात आलेला गायक अंकित तिवारी विवाहबंधनात अडकला. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या पल्लवी शुक्लाशी कानपूरमध्ये अंकितने लग्नगाठ बांधली. त्याने स्वत: सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत पत्नीसाठी सुरेख मेसेजदेखील लिहिला आहे. ‘तूच माझी वर्तमान आणि माझं भविष्यही तूच आहेत,’ असं कॅप्शन अंकितने या फोटोंना दिलं आहे.

एका प्रवासादरम्यान अंकितच्या आजीची पल्लवीशी भेट झाली आणि त्यांनीच सुरुवातीला अंकितसाठी तिला पसंत केलं. पल्लवी अतिशय साधी मुलगी असून तिच्यातील साधेपणाच मला जास्त भावतो असं तो म्हणाला. मंगळवारी म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडा झाला असून शुक्रवारी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. मुंबईत परतल्यावर मित्र-परिवार आणि बॉलिवूडमधील सहकाऱ्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 11:02 am

Web Title: ankit tiwari got hitched to engineer pallavi shukla
Next Stories
1 ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी कर्जत महोत्सवास येणार
2 Top 10 News: वैभव तत्ववादीपासून ते मणिकर्णिका कंगनापर्यंत…
3 नफा आणि तोट्याच्या दुनियेत समाजाचा विसर पडायला नको- डॉ. प्रकाश आमटे
Just Now!
X