News Flash

प्रियकराच्या मृत्यूनंतर खचून मलेशियाला गेलेली अंकिता मिलिंदला भेटली अन..

या पोस्टमध्ये अंकिताने मिलिंद भेटण्यापूर्वी तिच्या बॉयफ्रेंडचा अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगितले

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतो. त्याने त्याच्या पेक्षा २६ वर्षांनी लहान असणाऱ्या अंकिता कोनवारसह २०१८साली लग्न केले. लग्नाआधी मिलिंद आणि अंकिताने घरातल्यांना लग्नासाठी कसे तयार केले तसेच त्या दोघांची पहिली भेट कशी झाली याचा खुलासा एका पोस्टद्वारे केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘ह्युमन ऑफ बॉम्बे’ नावाच्या फेसबुक पेजवर अंकिता आणि मिलिंदने त्यांची लव्हस्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने मिलिंदला भेटण्यापूर्वी तिच्या प्रियकराचा अकस्मात मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या मृत्यूनंतर अंकिता मलेशियाला गेली. तेथे गेल्यानंतर अंकिता एअर एशियामध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करत होती. काही दिवसांनंतर तिची चेन्नईला बदली झाली आणि अंकिता पुन्हा भारतात परतली.

अंकिता चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये राहत होती. एक दिवस अचानक तिने लॉबीमध्ये मिलिंद सोमणला पाहिले. अंकिता मिलिंदची खूप मोठी चाहती होती. तिने मिलिंदशी संवाद साध्यण्याचा प्रयत्न केला. परंतु, मिलिंद त्याच्या कामात व्यग्र होता. काही दिवसांनंतर अंकिता एका नाईट क्लबमध्ये पार्टीसाठी गेली होती. दरम्यान मिलिंद देखील तेथे उपस्थित होता. तेथे दोघांमध्ये संभाषण झाले. काही दिवसानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरु झाले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

पाच वर्ष ऐकमकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अंकिता आणि मिलिंदच्या घरातल्यांची लग्नाला नकरा दिला होता. परंतु मुलांच्या आनंदापुढे पालकांचे काही चालत नसल्याचे अंकिताच्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे अंकिता आणि मिलिंदच्या लव्हस्टोरीने अनेक वळण घेतली असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 3:30 pm

Web Title: ankita konwar open up about her relationship with milind soman
Next Stories
1 गणेश गायतोंडेनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी होणार ‘Serious Man’
2 Bigg Boss 2 : या आठवड्यात घरातल्या सदस्यांसमोर असेल ‘हा’ नवा टास्क
3 ‘या’ कारणासाठी शाहरुखने मानले करण, आदित्य चोप्राचे आभार
Just Now!
X