News Flash

“म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते”; अंकिता लोखंडेने सांगितलं कारण

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यविधीला कलाविश्वातील मोजके कलाकार उपस्थित होते. सुशांतच्या अंत्यविधीला उपस्थित न राहण्यामागचं कारण त्याची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडेनं सांगितलं. “सुशांतला जर मी त्या अवस्थेत पाहिलं नसतं तर मी कधीच विसरले नसते. म्हणून मी अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला”, असं अंकिताने सांगितलं. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर १५ जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने सांगितलं, “मी झोपले होते आणि तेव्हा एका पत्रकाराचा मला फोन आला. त्या पत्रकाराने मला सुशांतच्या आत्महत्येची बातमी सांगितली. ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुशांत आत्महत्या करेल याचा मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. काय करावं हेच मला सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला मी जाऊ शकले नव्हते. कारण जर मी सुशांतला त्या अवस्थेत पाहिलं असतं तर ती गोष्ट मी कधीच विसरू शकले नसते. म्हणून मी अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला.”

आणखी वाचा : “…तर सुशांतने तेव्हाच आत्महत्या केली असती”; अंकिता लोखंडेचा खुलासा

सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतरही अंकिता ही सुशांतचे वडील व त्याच्या बहिणींच्या संपर्कात होती. म्हणून अंत्यविधीनंतर अंकिताने त्यांची भेट घेतली. “मला त्याच्या कुटुंबीयांना भेटायचं होतं. ज्याला जायचं होतं तो गेला पण त्याचे वडील आणि बहिणी होत्या. त्यांना भेटणं माझं कर्तव्य होतं”, असं ती पुढे म्हणाली.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिताची भेट झाली. या मालिकेत एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मार्च २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिताचं ब्रेकअप झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 11:57 am

Web Title: ankita lokhande on why she did not go to sushant singh rajput funeral ssv 92
Next Stories
1 ‘जगात मित्र शोधणं आणि…’; प्रसाद ओकच्या फ्रेंडशीप डेनिमित्त खास शुभेच्छा
2 सोनू सूद होणार अनाथांचा नाथ : आई-वडील गमावलेल्या ३ मुलांची जबाबदारी स्वीकारली
3 “…तर सुशांतने तेव्हाच आत्महत्या केली असती”; अंकिता लोखंडेचा खुलासा
Just Now!
X