27 January 2021

News Flash

‘त्याला कर्म म्हणतात’; रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची पोस्ट

एनसीबीकडून रियाला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज (मंगळवारी) अटक करण्यात आली. रियाच्या अटकेनंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ‘न्याय’ असं लिहित अंकिताने ही पोस्ट शेअर केली.

‘योगायोगाने किंवा नशिबाने काहीही घडत नाही. आपण आपल्या कृतीतून आपलं स्वतःचं नशिब तयार करतो. त्यालाच कर्म म्हणतात,’ अशी पोस्ट अंकिताने शेअर केली.

आणखी वाचा : ‘आज रात्री दिवाळी साजरी होणार’; रिया अटकेनंतर चेतन भगत यांचं ट्विट

अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) रियाच्या अटकेची कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 5:25 pm

Web Title: ankita lokhande post after rhea chakraborty arrested by ncb ssv 92
Next Stories
1 “आता तरी देशातील मूळ समस्यांवर लक्ष द्याल का?”; रियाच्या अटकेनंतर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
2 रियाला अटक : “न्यायाची थट्टा चालवली आहे, तीन केंद्रीय यंत्रणा एका महिलेची…”
3 “काही लोक स्वत:ला शेरलॉक होम्स समजतात”; आणखी एका अभिनेत्रीचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा
Just Now!
X