बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे बॉलिवूड सिनेसृष्टीला जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान तब्बल एक महिन्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य
अंकिताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये देवाऱ्यात दिवा लावलेला दिसत आहे. या फोटोवर तिने “देवाचा मुलगा” असं कॅप्शन लिहून सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल
सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं.