News Flash

…जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…

अंकिता लोखंडेला प्रियांका चोप्राने दिलं होतं प्रोत्साहन

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मृत्यूनंतर त्याचे अनेक जुने फोटो व व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या यादीत आता आणखी एका व्हिडीओची नोंद झाली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता त्याला प्रपोज करतानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

हा व्हिडीओ कुठल्याशा रिअॅलिटी शोमधील आहे. या शोमध्ये अंकिताने स्टेजवर जाऊन सुशांतला ‘आय लव्ह यु’ असं म्हटलं होतं. तिला प्रपोज करताना पाहून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील दिसत आहे. ती अंकिताला प्रोत्साहन देत आहे. सुशांतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

अवश्य पाहा – पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांची प्रेमकहाणी सुरू झाली. सहा वर्षे हे दोघं एकत्र होते. मालिकेपासून चित्रपटापर्यंतच्या सुशांतच्या प्रवासात अंकिता त्याच्यासोबत होती. मात्र काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 11:47 am

Web Title: ankita lokhande propose sushant singh rajput on stage mppg 94
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे प्रिती आणि राणीच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट?
2 अमिताभ बच्चन यांनी कवितेतून केला डॉक्टरांना सलाम
3 ‘मला प्रसूती कळा सुरु असताना नवाज गर्लफ्रेंडसोबत बोलत होता’; पत्नीने केला नवा आरोप
Just Now!
X