पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या भाषणादरम्यान मोदींनी ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा अनेकदा उच्चार केला. मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना पडला आहे.

अवश्य वाचा – “मोदींचं भाषण ऐकून प्रेरणा मिळाली”; अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

“आत्मनिर्भरता या शब्दाचा अर्थ काय आहे? कोण आत्मनिर्भर होणार आहे? आपल्याला की देशाला कोणाला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. सध्या आपला देश आत्मनिर्भर का नाही? मोदीजी कुठली नवी योजना घेऊन येणार आहेत का?” अशा आशयाचा एक लेख अनुभव सिन्हा यांनी ट्विट केला आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

अनुभव सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते नेहमीच व्यक्त होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाषण करताना काय म्हणाले होते मोदी?

करोनापूर्वीचे आणि नंतरचे जग बदललेले असेल. अशा वेळी विश्वाला पुढील मार्ग दाखवण्याचे काम भारताला करावे लागेल. करोनाआधी भारताकडे पीपीई, एन-९५ मास्क नव्हते. दररोज आता २ लाख पीपीई, २ लाख एन-९५ मास्क बनवले जात आहेत. जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने २१ शतक भारताचेच असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. टीबी, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो. भारताची औषधे जगाला नवी आशा देतात. जग भारताची प्रशंसा होते. मानवजातीच्या कल्याणासाठी १३० कोटी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो, असं मोदी जनतेशी संवाद साधताना म्हणाले.