बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेली भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू ही जोडी आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘वो मेरी स्टूडेंट है’ असे आहे. जसलीनने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.

बिग बॉस या लोकप्रिय शोच्या १२व्या पर्वात अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी भाग घेतला होता. बिग बॉसचे हे पर्व दोघांच्या कथीत प्रेमसंबंधांमुळे प्रचंड चर्चेत होते. या शोमधून बाहेर आल्यानंतर अनेकदा त्यांना याबाबत विचारण्यात आले. परंतु त्यांनी कधीही उघडपणे आपल्या नात्याबाबत खुलासा केला नाही. ‘वो मेरी स्टूडेंट है’ या आगामी चित्रपटातून अनुप जलोटा जसलीन मथारू बरोबर असलेल्या आपल्या नात्याबद्दल सांगणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Coz i love this pic Accessories @kriham_creations

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

हा चित्रपट अनुप जलोटा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ते या चित्रपटात एका संगीत शिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर जसलीन त्यांची विद्यार्थीनी होणार आहे. या चित्रपटाची पटकथा जसलीचे वडिल केसर मथारु यांनी लिहिली आहे. १६ ऑगस्ट पासूनच या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात झाली आहे.