News Flash

त्या कार्यक्रमात भेट झाली अन्…, जाणून घ्या किरण आणि अनुपम खेर यांची लव्ह स्टोरी

जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी...

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे अनुपम खेर. वयाच्या २८व्या वर्षी करिअरला सुरुवात करणाऱ्या अनुमप खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असतात. ते सतत सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या अनुपम यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्य देखील चर्चेचा विषय ठरतो. अनुपम यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. आज ७ मार्च रोजी अनुपम खेर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी..

किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचे नाते होते. प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली. मात्र, यावेळी दोघांचेही लग्न झाले होते. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होते. यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

स्ट्रगलच्या काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांच्या पतीपासून गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते. त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:च नाव दिले.

अनुपम खेर यांनी जवळपास ३७ वर्षांच्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या राम लखन या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी ‘लम्हे’, ‘खेल’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘विजय’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातंमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 11:28 am

Web Title: anupam kher birthday special love story avb 95
Next Stories
1 शितलीच्या ‘लग्नाची पिपाणी’, शिवानी बावकर पुन्हा चर्चेत
2 Video: अनिता हसनंदानीने मुलाच्या कानात गुणगुणला गायत्री मंत्र, अशी होती चिमुकल्याची प्रतिक्रिया
3 परदेशात प्रियांकाने सुरु केले भारतीय रेस्टॉरंट
Just Now!
X