03 March 2021

News Flash

साठी ओलांडलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खानने ट्विटरवर त्यांचा हा फोटो शेअर केला.

आपल्या दमदार अभिनयाने त्याने आतापर्यंत अनेकांची वाहवा मिळवली. आतापर्यंत ५०० सिनेमांमध्ये काम केलं तर अनेक नाटकांमध्येही काम केले. सध्या वयाची ६० ओलांडलेला हा कलाकार मात्र आता वेगळंच काहीतरी करतो आहे. साधारणपणे साठी ओलांडल्यानंतर माणूस काम कमी करतो. पण हा कलाकार मात्र जीममध्ये दुपट्टीने घाम गाळताना दिसत आहे. बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खानने ट्विटरवर त्यांचा हा फोटो शेअर केला. ‘उपरवाला बॉडी बिल्डर की खेर करे’ असा मॅसेज सलमानने त्या फोटोवर लिहीला आहे.
हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने नावाजले गेलेले अभिनेते अनुपम खेर आहेत. सध्या ते त्यांच्या ५०१ व्या सिनेमाची तयारी करत आहेत. ‘हॉटेल मुंबई’ हा त्यांचा आगामी सिनेमा आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यावर हा सिनेमा आधारीत असल्याचे कळते.
एनएसडीमधून डिप्लोमा केल्यानंतर आणि सिनेमांमध्ये ब्रेक मिळण्याच्या मधल्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. दिल्लीवरुन मुंबईमध्ये कामानिमित्त आलेले खेर एका खोलीत राहत होते. त्या खोलीत त्यांच्याबरोबर अजून पाच सहकारीही राहत होते. सारांश हा पहिला सिनेमा मिळाल्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांच्या ऑफर्स यायला लागल्या. पहिला सिनेमा ते ५०० वा सिनेमा यापर्यंत अनुपम खेर कुठेही थांबले नाहीत. सतत नाविण्याच्या शोधात असणारे ते आता आपल्या स्वास्थ्यासाठीही तेवढीच मेहनत करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 3:08 pm

Web Title: anupam kher working hard on his body at gym
Next Stories
1 अमेय-निपुणला कंटाळून महेश मांजरेकरांनी पळ काढला !
2 VIDEO: ‘क्वांटिको २’च्या टीझरमध्ये प्रियांका चोप्राचा हॉट लूक
3 स्पृहा जोशीचे पहिले रौप्य पदक
Just Now!
X