News Flash

“..म्हणून सुशांतसोबत मला काम करायचं नव्हतं”; अनुराग कश्यपचे वॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल…

सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याच्या मॅनेजरने केलं होतं अनुराग कश्यपसोबत चॅट

अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने ‘गॅग्स ऑफ वासेपुर’, ‘देवडी’, ‘रामन राघव’, ‘ब्लॅक फ्रायडे’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे अनुरागच्या चित्रपटांमध्ये नव्या कलाकारांना काम करण्याची संधी अधिक मिळते. परंतु दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत मात्र काम करण्यास त्याने नकार दिला होता. त्याच्या या निर्णयामुळे सुशांतच्या चाहत्यांनी अनुरागवर जोरदार टीका केली होती. अखेर सुशांतच्या मॅनेजरसोबत केलेलं वॉट्सअ‍ॅप संभाषण शेअर करुन अनुरागने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

“हे चॅट शेअर केल्याबद्दल मला माफ करा. सुशांतच्या मृत्यूआधी तीन आठवड्यांपूर्वीचे हे चॅट आहेत. त्याच्या मॅनेजरसोबत २२ मे रोजी माझी बातचित झाली होती. काही कारणांमुळे मला सुशांतसोबत काम करायचं नव्हतं.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुराग कश्यपने २२ मे रोजी केलेल्या वॉट्सअ‍ॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या चॅटमध्ये मॅनेजर सुशांतला चित्रपटात काम देण्यासंदर्भात अनुरागला विचारतोय व अनुराग त्याला काम न देण्याचं कारण सांगत आहे. अनुरागने पोस्ट केलेला हा स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्र वर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:48 pm

Web Title: anurag kashyap didnt want to work with sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 रियाच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केला ‘तो’ खास मजकूर
2 ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’
3 ‘कदाचित तू इतकी वाईट…’; चित्रपट निर्मात्याने व्यक्त केली रियासोबत काम करण्याची इच्छा
Just Now!
X