बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो रोखठोकपणे आपली मतं मांडतो. परंतु यावेळी मात्र तो चक्क अभिनेत्री कविता कौशीकमुळे चर्चेत आहे. कविताच्या एका फोटोवर त्याने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही कॉमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशीक हिला योगाची प्रचंड आवड आहे. कठीणातील कठीण योगासन ती अगती सहज करते. अलिकडेच तिने योगा करतानाचा एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो पाहून अनुराग आश्चर्यचकित झाला. “हा कुठला बसण्याचा प्रकार आहे? गेल्या वेळी असं बसून मी नो स्मोकिंग या चित्रपटाची पटकथा लिहिली होती.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने कविताचं कौतुक केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.