News Flash

“दुबई में दुबके महाशय”, अनुराग कश्यपने केआरकेला सुनावले

त्याने ट्विट करत सुनावले आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने ट्विट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री कंगना रणौतसंबंधी ट्विट केल्याने त्याच्यावर निशाणा साधला आहे.

केआरकेने ट्विट करत ‘अनुराग कश्यप सर, तुम्ही बॉलिवूडमधील कोणत्या पार्टीमध्ये आहात हे जगाला कळू द्या. सलमानच्या ग्रूपमध्ये? यशराज फिल्म ग्रूपमध्ये? करण जोहरच्या ग्रूपमध्ये? कंगना ग्रूपचा विचार करण्यापेक्षा तूम्ही स्वत:चा विचार का करत नाही? ती तिचा विचार करु शकते’ असे म्हटले होते.

पाहा : शाहरुखच्या ‘मन्नत’पेक्षाही कमी नाही केआरकेचा ‘करोना फ्री बंगला’

केआरकेच्या ट्विटवर अनुराग कश्यपने लगेच उत्तर दिले आहे. तसेच त्याने ट्विटमध्ये ‘दुबई में दुबके महाशय’ असे केआरकेला म्हटले आहे. ‘या शहारात माझे किती लोक आहेत याचा तू विचारही करु शकत नाही. IMDB जाऊन पाहा. माझ्यापेक्षा जास्त चित्रपट कोणी केलेले नाहीत आणि लॉकडाउनमध्ये देखील माझ्या पेक्षा जास्त कोणी (चित्रपट\वेब सीरिज) रिलीज केले नसलीत. मी पुढची सात वर्षे व्यग्र आहे. धन्यवाद’ असे अनुरागने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 3:12 pm

Web Title: anurag kashyap slaim krk avb 95
Next Stories
1 ‘करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच…’; ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्रीने सांगितला अनुभव
2 “तुमच्या कार्यशाळेत मुले खूप चांगले शिक्षण घेतायेत”; अग्रिमा जोशुआने अनुपम खेर यांना सुनावलं
3 अनुराग कश्यप-रणवीर शौरी यांच्यात ट्विटरवर खडाजंगी
Just Now!
X