News Flash

“ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

कंगनाची मुलाखत पाहून अनुराग झाला चकित

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत सर्वात पुढे आहे. तिचे व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. मात्र तिच्या या आक्रमक अवतारावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने निशाणा साधला आहे. ही बाई प्रसिद्धीसाठी आता काहीही बोलतेय, असं म्हणत त्याने टीका केली आहे.

अवश्य पाहा – १६व्या वर्षी ‘हा’ अभिनेता करणार होता आत्महत्या; कारण ऐकून व्हाल थक्क…

अवश्य पाहा – स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…

काय म्हणाला अनुराग?

“काल कंगनाची एक मुलाखत पाहिली. कधी काळी ती माझी खुप चांगली मैत्रीण होती. मला प्रोत्साहन द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. तिची मुलाखत पाहून मला धक्काच बसला.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे.

त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केलं. “कंगनाच्या फॉलोअर्सने तिला आरसा दाखवायला हवा त्याऐवजी ते तिला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. ती आता काहीही बोलतेय. तिच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही. याचा शेवट इथेच होणार. खऱ्या कंगनाला मी ओळखतो त्यामुळे या नव्या कंगनाकडे मला आता पाहवत नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुरागने कंगनावर निशाणा साधला. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:48 pm

Web Title: anurag kashyap vs kangana ranaut twitter war mppg 94
Next Stories
1 सुशांतच्या बायोपिकमध्ये ‘हा’ टिकटॉक स्टार साकारणार सुशांतची भूमिका
2 कंगना रणौतवर टीका केल्यामुळे तापसी झाली ट्रोल, मीम्स व्हायरल
3 ‘अभिषेकला मिठी मारल्यानंतर क्वारंटाइनमध्ये जाण्यासही तयार’; सहकलाकाराची पोस्ट
Just Now!
X