‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात आणि ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुरिता झा आता ‘परिवार’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अनुरिता या सीरिजमध्ये मंजूची भूमिका साकारत असून तिच्यासोबतच विजय राज, रणवीर शौरी आणि यशपाल शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या सीरिजमध्ये काम करण्याच्या अनुभवाविषयी अनुरिता म्हणाली, “माझ्या सहकलाकारांना अभिनय करताना पाहून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येकाच्या अभिनयाची एक वेगळी शैली आहे. सर्व कलाकार अफलातून आहेत.”
परिवार ही एक विनोदी सीरिज आहे. सागर बल्लारी यांनी सीरिजचे दिग्दर्शन केलं असून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ती प्रदर्शित झाली आहे. वडील मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या मालमत्तेवरून होणाऱ्या वादाभोवती या सीरिजची कथा फिरते. या सीरिजमध्ये गजराज राव, सादिया सिद्दिकी आणि निधी सिंह यांच्याही भूमिका आहेत.