28 September 2020

News Flash

Video : अनुष्का कुत्र्याला चिडवताना अचानक घडला ‘हा’ प्रकार

या श्वानाने जे केलं ते पाहून अनेकांना हसू अनावर झालं

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर मस्तीखोर स्वभावामुळेही ओळखली जाते. बऱ्याच वेळा तिचा हा मस्तीखोर अंदाज चित्रपटांमध्येही पाहायला मिळतो. तिच्या मस्तीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका पाळीव श्वानाला मुद्दाम गाणं म्हणून त्रास देत आहे. विशेष म्हणजे तिचं गाणं ऐकून या श्वानाने जे केलं ते पाहून अनेकांना हसू अनावर झालं.

मस्तीखोर अंदाजासाठी ओळखली जाणारी अनुष्का एका श्वानासमोरही मस्ती करत असून मुद्दाम त्याला त्रास देत आहे. तिच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातं एक गाणं ती या श्वानासमोर जोरजोरात म्हणत आहे. विशेष म्हणजे ती मस्ती करत असल्याचं या श्वानाच्याही लक्षात आलं आणि तोदेखील तितक्याच प्रेमाने तिच्याजवळ गेला.

 

View this post on Instagram

 

Love with pets #anushksharma

A post shared by WHAT’S UP BOLLYWOOD (@whatsupbollywood) on

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


दरम्यान, अनुष्काला प्राण्यांची विशेष आवड असल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी ती पती विराट कोहलीसोबत भूतानला गेली होती. त्यावेळीदेखील तेथील एका श्वानासोबत फोटो काढून तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. इतकंच नाही वरळीमध्ये एका भटक्या कुत्र्याला अमानुषपणे वागणूक मिळाल्याचं समजताच त्यावरही तिने संताप व्यक्त केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 10:57 am

Web Title: anushka sharma video viral dog attack on her ssj 93
Next Stories
1 ‘पानिपत’च्या कथेवर हक्क सांगत विश्वास पाटील यांचा सात कोटींचा दावा
2 “मेकअप करुन वय लपणार नाही”; नेटकऱ्यांनी केलं मलायकाला ट्रोल
3 सावित्री-जोतिरावांच्या चरित्रावर मालिका
Just Now!
X