News Flash

विश्वचषक स्पर्धेतील अनुष्काच्या या लूकची जोरदार चर्चा

अनुष्काच्या वेगवेगळ्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला पोहोचली होती. दरम्यान अनुष्काच्या वेगवेगळ्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या सोशल मीडियावर अनुष्काच्या याच लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. चला पाहूया अनुष्काचे ‘वर्ल्ड कप’ लूक…

भारत विरुद्ध श्रीलंका सामना पाहण्यासाठी अनुष्का स्टेडियममध्ये पोहोचली होती. दरम्यान तिने पिवळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला असून कळ्या रंगाचा गॉगल घातला होता. तिच्या या लूकने अनेकांची मने जिंकली.

त्यानंतर अनुष्का विराटसह पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट पॅन्टमध्ये दिसली होती. ती या लूकमध्ये अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती.

अनुष्काने डेनिम आऊटफिट देखील परिधान केल्याचे पाहायला मिळाले. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले होते. तिचा हा हटके लूक अनेक चाहत्यांना आवडला.

अनुष्काचा आणखी एक सुंदर लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या वन पीस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले आहेत.

या काळ्या रंगाच्या वन पीसमधील लूकमध्ये अनुष्का सुंदर आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 1:32 pm

Web Title: anushka sharma world cup 2019 looks avb 95
Next Stories
1 #WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर
2 ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’साठी ‘बधाई हो’ची लोकप्रिय टीम एकत्र
3 इंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक
Just Now!
X