News Flash

लग्नाच्या ७ वर्षांनंतर ‘दंगल’ फेम अभिनेता होणार बाबा

जाणून घ्या कोण आहे अभिनेता

२०२१ या नव्या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकरांच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला. त्यानंतर कॉमेडीयन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. तसेच अभिनेत्री करीना कपूर खानने देखील मुलाला जन्म दिला. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडण्यात आले आहे. आयुषमान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना लवकरच बाबा होणार आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अपारशक्ति आणि त्याची पत्नी आकृती लवकरच चाहत्यांना गूड न्यूज देणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दोघांचेही कुटुंबीय सध्या आनंदी आहेत. पण याबाबत आकृती किंवा अपारशक्तिने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by AakritiAhuja (@aakritiahuja)

२०१४मध्ये अपारशक्ति आणि आकृती लग्नबंधनात अडकले होते. त्यांची ओळख चंदीगढमधील एका डान्स क्लासमध्ये झाली होती. आकृती सोशल मीडियावर सतत पती अपारशक्तिसोबतचे फोटो शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अपारशक्तिने लग्न केले.

२०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने अपारशक्तिला ओळख मिळवून दिली होती. या चित्रपटात त्याने गीता-बबिताचा चुलत भावाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर त्याने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 3:19 pm

Web Title: aparshakti khurana and wife aakriti ahuja are expecting their first child avb 95
Next Stories
1 Video: प्रितीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, जेनेलियाने केली धुलाई
2 ऋषी सक्सेनाची वेब सीरिज चर्चेत, मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
3 दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत जान्हवी कपूर करणार काम?
Just Now!
X