News Flash

न्यूड फोटो : पूनमवर गुन्हा, मिलिंदचं कौतुक – दिग्दर्शकाचं खोचक ट्विट

सध्या त्याचे हे ट्विट चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर पूनम पांडे आणि मिलिंद सोमण चर्चेत आहेत. दोघांनीही गोव्यामध्ये शूट केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे मिलिंदने शेअर केलेल्या फोटोची प्रशंसा करण्यात आली होती. मिलिंद सोमणचं कौतुक आणि पुनम पांडेवर गुन्हा या दुटप्पी भूमिकेवर दिग्दर्शक अपूर्व असरानीने ट्विट केलं आहे.

‘पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांनी वाढदिवसानिमित्त गोव्यातील बीचवर न्यूड फोटोशूट केले. मिलिंद पूर्णपणे नग्नावस्थेत होता. तर पूनमचं फोटोशूट पूर्णपणे नग्नावस्थेतील नव्हते. अश्लिलतेप्रकरणी पूनम कायद्याच्या कचाट्यात सापडली. तर दुसरीकडे ५५ व्या वर्षीही फिट असलेल्या सोमणचे कौतुक करण्यात आले. मला वाटतं आपण नग्नावस्थेतील स्त्रीपेक्षा नग्नावस्थेतील पुरुषांवर उदारता दाखवतो’ या आशयाचे ट्विट अपूर्वने केले असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मिलिंद सोमणने ५५ वा वाढदिवस साजरा करताना न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट करत वयाच्या ५५व्या वर्षी फिट असल्याचे म्हणते प्रशंसा केली होती. अभिनेत्री कविता कौशिकने तर मिलिंदचा हा फोटो शेअर केला होता. तर दुसरीकडे अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर अपूर्वने ट्विट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 6:13 pm

Web Title: apurv asrani tweet on milind soman and poonam pandey avb 95
Next Stories
1 ‘प्रतिष्ठित व्यक्तीला अटक करणं चुकीचं’; अर्णब गोस्वामींच्या अटकेवर मुकेश खन्ना संतापले
2 ‘सुर्यवंशी’ व ’83’चं प्रदर्शन लांबणीवर; पुढच्या वर्षीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा
3 ‘माझी डुप्लिकेट पाहा’; सायनाने शेअर केला बायोपिकमधील परिणीतीचा फर्स्ट लूक
Just Now!
X