News Flash

भावंडं म्हणत १३ वर्षे लपवलं होतं नातं; आता समलैंगिक जोडप्याने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांचा लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अपूर्व असरानीने गेल्या वर्षी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या रिलेशनशीप विषयी सांगितले होते. त्याने गेल्या काही वर्षांपासून सिद्धांतला डेट करत असल्याचे सांगितले होते. पण आता त्यांच्या नात्यामध्ये फूट पडली आहे. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

अपूर्व आणि सिद्धांत गेली १४ वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता अपूर्वने सोशल मीडिया पोस्टद्वारे ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. ‘मला तुम्हा सर्वांना सांगताना दु:ख होत आहे की मी आणि सिद्धांतने वेगळं होण्याचे ठरवले आहे. मला माहिती आहे की LGBTQ समुदायासाठी आम्ही एक आदर्श होतो. पण गेल्या १४ वर्षांतील प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा होता’ असे अपूर्वने म्हटले आहे.

पुढे त्याने पोस्टमध्ये म्हटले, ‘मला अजूनही आशा आहे सिद्धांत माझ्या आयुष्यात परत येईल.’ अपूर्व आणि सिद्धांतने जवळपास १३ वर्षे सर्वांपासून त्यांचे रिलेशनशीप लपवले होते. ते दोघे भावंडं असल्याचे सर्वांना सांगायचे. पण गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी पार्टनर्स असल्याचे सांगितले. त्यांच्या रिलेशनला आता जवळपास १४ वर्षे झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva (@apurva_asrani)

“गेल्या १३ वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत. मात्र कायम आम्हाला भावंड असल्यासारखं वावरावं लागत होते. घर भाड्याने मिळावं यासाठी आम्हाला भाऊ असल्याचं नाटक करावं लागत होतं. तसंच शेजारील लोकांना आमच्या नात्याविषयी कळू नये त्यामुळे कायम आम्हाला घराचे पडदे लावून ठेवायला लागत असत. मात्र काही काळापूर्वीच आम्ही दोघांनी स्वत:च घर घेतलं आहे. त्यामुळे आता आम्ही स्वत:हून लोकांना आमच्या नात्याविषयी सांगतो. आम्ही एकमेकांचे पार्टनर आहोत हे बिंधास्त सांगतो. हिच ती वेळ आहे जेव्हा LGBTQ मधील नागरिकांना समाजात वावरण्याचा दर्जा मिळेल”, असे ट्वीट अपूर्वने केले होते.

दरम्यान, अपूर्व कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने ‘सत्या’, ‘शाहिद’, ‘सिटीलाइट्स’, ‘अलिगढ’, ‘सिमरन’ या चित्रपटांचे लेखन केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 6:04 pm

Web Title: apurva asrani parted ways with partner siddhant avb 95
Next Stories
1 साऊथ स्टार विजय सेतूपती होणार ‘मुंबईकर’; पोस्टर प्रदर्शित
2 अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’चा टीव्ही विश्वात नवा विक्रम
3 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाल्यानंतर रजनीकांत यांनी का मानले बस चालकाचे आभार?
Just Now!
X