News Flash

पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत – अपूर्वा नेमळेकर

अपूर्वाने 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत शेवंता हे पात्र साकारले होते

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करत आहे. चाहते तिला मालिकेत पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. अपूर्वा झी युवावरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ४ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक अपूर्वाच्या शेवंता या व्यक्तिरेखेला अजूनही विसरू शकले नाही पण आता त्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे अपूर्वाच्या पम्मी या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायची.

अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता याच मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अपूर्वा तिच्या आगामी मालिकेत पम्मी हे पात्र साकारणार आहे. त्यामुळे शेवंत आणि पम्मी या दोन्ही पात्रांची तुलना होत आहे. त्यावर अपूर्वाने वक्तव्य केले आहे.

“पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ती नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. पण पम्मी ही एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. पम्मी ही तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गंमत आणणार आहे” असे अपूर्वाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:30 pm

Web Title: apurva namlekar on comparison between pamy and shevanta avb 95
Next Stories
1 आदित्यच्या घरी लगीनघाई! पार पडला रोका समारंभ
2 ‘शाहरुख प्रमाणे बुर्ज खलिफावर वाढदिवस साजरा करायची इच्छा’, सोनू सूदचे नेटकऱ्याला भन्नाट उत्तर
3 Video : बम भोले! अंगावर काटा आणणारं ‘लक्ष्मी’मधील गाणं प्रदर्शित
Just Now!
X