News Flash

“तुमचा लूक बघून तुम्हाला सर्व बाहेरवालीचेच…”, असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला शेवंताचे उत्तर

अपूर्वाने त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर टीव्हीवर पुनरागमन करत आहे. हा तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच आहे. लवकरच ती झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या मालिकेतील लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना अपूर्वाने चांगलेच सुनावले आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी या प्रोमोला चांगला प्रतिसाद दिला. पण काही नेटकऱ्यांनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अपूर्वानेही शांत न बसता त्या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रोमो पाहून एका नेटकऱ्याने “तुमचा लूक पाहता सगळे सीरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का?” अशी कमेंट केली. त्यावर अपूर्वाने, “या सीरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?” असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद केली आहे. तसेच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील नावावर निशाणा साधत अपूर्वा म्हणाली की “आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना.”

अपूर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाच्याच चाहते प्रेमात आहेत. आता अपूर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार आहे का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:39 pm

Web Title: apurva nemlekar slam trollers avb 95
Next Stories
1 “हा शो आता कंटाळवाणा झालाय”; माजी स्पर्धकांची ‘बिग बॉस’च्या नावानं बोंब
2 करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीलाच करोनाची लागण
3 आदिपुरुष चित्रपटात अजय देवगण दिसणार ‘या’ भूमिकेत?
Just Now!
X