08 March 2021

News Flash

सिद्धूंच्या खुर्चीवर अर्चना विराजमान, ‘द कपिल शर्मा शो’ च्या चित्रीकरणाला सुरूवात

पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूंची वाहिनीनं हकालपट्टी केली.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानाची पाठराखण केल्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली. आता त्यांच्या खुर्चीवर अर्चना पूरन सिंग विराजमान झाली असून ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सिद्धू आणि कपिल शर्मा ही जोडी लोकप्रिय होती. पण प्रेक्षकांमध्ये बसून ‘द कपिल शर्मा शो’चा आनंद घेणारे आणि आपल्या शेरो शायरीनं पाहुण्यांना खूश करणारे सिद्धू यापुढे शोचा भाग नसतील. त्याजागी आता अचर्नाची निवड निर्मात्यांनी केली आहे.
अर्चना अनेक बॉलिवूड चित्रपटात विनोदी भूमिकांत दिसली आहे. बॉलिवूडमध्ये विनोदी भूमिका करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी ती आहे. ‘कॉमेडी सर्कस’ या कॉमेडी शोच्या परीक्षकाच्या भूमिकेतही अर्चना होत्या. अर्चनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरचा सेल्फी शेअर केला आहे.

का केली सिद्धूंची गच्छंती
पुलवामा हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असताना सिद्धूंनी मात्र पाकिस्तानची पाठराखण केली होती. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा असा सल्ला सिद्धूंनी दिला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली. सोशल मीडियावर सिद्धूंना कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर वाहिनीनं सिद्धू यांना शोमधून काढून टाकलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 12:41 pm

Web Title: archana puran singh finally replaced navjot singh sidhu
Next Stories
1 ‘संवादाने प्रश्न सुटत असते तर तुम्हाला तीन लग्नं करावी लागली नसती’, रामूचा इम्रान यांना टोला
2 #KesariTrailer : ‘आज मेरी पगडी केसरी, जो बहेगा वो मेरा लहू भी केसरी’
3 चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन
Just Now!
X